आर्थिक मदतीसोबत पत्नीच्या त्यागामुळे वाचले पतीचे प्राण
अकोला : आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना यकृत प्रत्यारोपणासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च आवश्यक होता. अशा कठीण परिस्थितीत पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करण्याचा धाडसी निर्णय घेत पती प्रशांत इंगळे यांना नवजीवन दिले. त्यांच्या या त्यागाची आणि धैर्याची प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे.
अकोला येथील केबल टाकण्याचे काम करणारे ४७ वर्षीय प्रशांत इंगळे यांचे यकृत गंभीररीत्या निकामी होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र, लाखो रुपयांचा उपचार खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर होता.
या कठीण प्रसंगी पत्नी वर्षा इंगळे यांनी खंबीरपणे पतीच्या उपचारासाठी पुढाकार घेतला. पतीचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करण्याचा निर्णय घेत त्यांनी आपल्या प्रेमासोबतच विलक्षण धैर्य आणि त्यागाचे उदाहरण समाजासमोर ठेवले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २ लाख रुपये, तर टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आणि यकृत प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला.
२५ जून २०२६ रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात प्रशांत इंगळे यांच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने १३ जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होत आहेत.
पतीच्या आयुष्यासाठी स्वतःच्या शरीराचा अवयव दान करण्याचा निर्णय घेणाऱ्या वर्षा इंगळे यांचे धैर्य आणि त्याग खरोखरच प्रेरणादायी आहे. संकटाच्या काळात खंबीरपणे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून त्यांनी ‘साथ’ या शब्दाचा खरा अर्थ कृतीतून दाखवून दिला आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाला मनापासून सलाम!
वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आणि पत्नीच्या त्यागामुळे नवजीवन मिळाल्याबद्दल इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि टाटा ट्रस्टचे आभार मानले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन
Related Posts
Add A Comment

