कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन, कन्नड यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त वसीम शेख यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मान्यववरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वसीम शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कन्नड तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आयशा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासोबतच, शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या द्वारे त्यांनी विविध सामाजिक उपक्रम आणि क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे.
या कार्याची दखल घेऊन प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन तर्फे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ होत्या. तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक आरती आर. पवार, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव, दि रहेमानिया वेलफेअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष
अहेमद अली मोहम्मद अली (भैया मेंबर),साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष डॉ. मिलींद पाटील यांची उपस्थित होती. आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्याबद्दल वसीम शेख यांनी प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश शर्मा यांचे आभार मानले. या सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसीम शेख यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
Related Posts
Add A Comment

