फुलंब्री : तालुक्यात यंदा अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाले असून, विहिरी कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना करून शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संदीप बोरसे, सुदाम मते, संतोष मेटे, सदाशिव विटेकर, पंढरीनाथ जाधव यांच्यासह तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.
शासनाने मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
Related Posts
Add A Comment

