Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»गुन्हेगारी»वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई न करण्यासाठी १ लाख २० हजारांची लाच मागितली; तलाठी ७० हजारांची लाच घेताना जाळ्यात
गुन्हेगारी

वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई न करण्यासाठी १ लाख २० हजारांची लाच मागितली; तलाठी ७० हजारांची लाच घेताना जाळ्यात

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

बीड : वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांवर कारवाई न करण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ७० हजार रुपये स्वीकारणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यास (तलाठी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई १८ ऑगस्ट २०२६ रोजी गेवराई येथे करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर घटकाकडे ३५ वर्षीय शेतकऱ्याने याबाबत लेखी तक्रार दिली होती. तक्रारदार वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांवर कारवाई होऊ नये यासाठी तलाठी विलास राजेंद्र मोराळे (वय ४७) यांच्याकडून लाचेची मागणी होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. मोराळे हे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), सजा खामगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे कार्यरत आहेत.
तक्रारीच्या अनुषंगाने १८ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. यावेळी तक्रारदाराला गेवराई येथील खासगी कार्यालयात बोलावून वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांवर कारवाई न करण्यासाठी आरोपी लोकसेवकाने १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती ७० हजार रुपये स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य करण्यात आले.
त्यानंतर रचण्यात आलेल्या सापळ्यात तक्रारदार १८ ऑगस्ट रोजी कोल्हेर रोड, गेवराई येथील खासगी कार्यालयात गेला. यावेळी आरोपी तलाठी विलास मोराळे यांनी पंचांसमक्ष ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या प्रकरणी गेवराई पोलीस ठाणे, जिल्हा बीड येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला १८ ऑगस्ट रोजी दुपारी २.५० वाजता ताब्यात घेण्यात आले.
ही सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांनी काम पाहिले. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांनी कारवाईवर देखरेख केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार अनवेज शेख, पोलीस अंमलदार प्रकाश डोंगरदिवे आणि चालक पोलीस अंमलदार राम ताठे यांचा सहभाग होता.
या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे तसेच अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक शासकीय कामासाठी लाच मागत असल्यास नागरिकांनी त्याबाबत तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. छत्रपती संभाजीनगर येथील घटक कार्यालयाशी ०२४०-२३४४०५० या क्रमांकावर, तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ आणि व्हॉट्सअॅप क्रमांक ७७२०८९१०६४ वर संपर्क साधता येईल.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण प्रेस नोट

September 3, 2026

वरूड शिवारात ५ गोवंश जनावरांची सुटका, १.१५ लाखांचा मुद्देमाल व कत्तलीचे साहित्य जप्त

August 30, 2026

घातक रासायनिक कचऱ्याच्या बहुराज्यीय सिंडिकेटचा मास्टरमाईंड अखेर जेरबंद; इस्तेकार खानच्या अटकेने ‘विषारी नफ्याच्या रॅकेटचे धागेदोरे उघड..

August 30, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.