Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सातारा–देवळाईचा पाण्याचा यक्षप्रश्न सुटणार तरी कधी?

November 1, 2026

माईंड पॉवर कार्यशाळेतून मनाच्या शक्तीची ओळख करून देणार

November 1, 2026

छत्रपती संभाजीनगरकरांनो… स्वतःमधील शक्ती ओळखा आणि बदलाची सुरुवात करा!

October 31, 2026

Our Visitor

0 4 4 4 3 7
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»महावितरणचा कंत्राटी इलेक्ट्रिशियन २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला!
छत्रपती संभाजीनगर

महावितरणचा कंत्राटी इलेक्ट्रिशियन २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला!

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comOctober 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

वीजचोरीच्या कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी; शिवाजीनगर परिसरातील घटनेने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : वीजबिलातील तफावत आणि वीजचोरीच्या कारवाईची भीती दाखवून तक्रारदार महिलेकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून महावितरणच्या कंत्राटी इलेक्ट्रिशियनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. विष्णू सीताराम खरात (वय ५०, रा. मिसारवाडी) असे संशयिताचे नाव असून, या कारवाईमुळे महावितरणच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कारवाईची भीती दाखवून लाचेची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी तक्रारदार महिलेच्या घरी महावितरणच्या पथकाने वीज मीटरची तपासणी केली होती. यावेळी वीजबिल कमी आल्याचे कारण पुढे करत संबंधित महिलेवर वीजचोरीची कारवाई होऊ शकते आणि त्यासाठी ६० ते ७० हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो, अशी भीती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

ही कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून प्रकरण मिटवून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर संबंधित महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारले

तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यानंतर तडजोडीत २५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याची माहिती समोर आली. सोमवारी दुपारी सापळा रचण्यात आला. यावेळी महिलेकडून लाचेची रक्कम स्वीकारताना खरात याला पथकाने पकडल्याचे वृत्त आहे.

कठोर कारवाईची मागणी

या घटनेमुळे वीजग्राहकांकडून कामाच्या मोबदल्यात अवैध पैशांची मागणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. संबंधित संशयित गेल्या दहा वर्षांपासून महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून इतर संबंधितांची भूमिकाही तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक विशाल बहातरे, पोलीस निरीक्षक शांतिलाल चव्हाण, अंमलदार रवींद्र काळे, अशोक नागरगोजे आणि चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.

प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधित आरोपांची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होईल.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

सातारा–देवळाईचा पाण्याचा यक्षप्रश्न सुटणार तरी कधी?

November 1, 2026

माईंड पॉवर कार्यशाळेतून मनाच्या शक्तीची ओळख करून देणार

November 1, 2026

छत्रपती संभाजीनगरकरांनो… स्वतःमधील शक्ती ओळखा आणि बदलाची सुरुवात करा!

October 31, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

सातारा–देवळाईचा पाण्याचा यक्षप्रश्न सुटणार तरी कधी?

By Maharashtranewstimes2026@gmail.comNovember 1, 20260
Spread the love

– दहा वर्षे महापालिकेत, कोट्यवधींचा महसूल; तरी नागरिकांच्या घशाला कोरड सातारा–देवळाई परिसराचा २०१६ मध्ये छत्रपती…

माईंड पॉवर कार्यशाळेतून मनाच्या शक्तीची ओळख करून देणार

November 1, 2026

छत्रपती संभाजीनगरकरांनो… स्वतःमधील शक्ती ओळखा आणि बदलाची सुरुवात करा!

October 31, 2026

डॉ. गोंधणे १३ नोव्‍हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे

October 31, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.