तापडिया नाट्य मंदिरात रविवारी मोफत सेमिनार; तणाव, भीती, चिंता आणि नातेसंबंधांतील समस्यांवर मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर : मनाची शक्ती ओळखून विचारांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘माईंड पॉवर – पॉवर ऑफ सबकॉन्शस माइंड’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरातील तापडिया नाट्य मंदिर येथे करण्यात आले आहे. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणाऱ्या या कार्यशाळेत प्रवेश विनामूल्य असून, पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक नागरिकांना तणाव, नैराश्य, भीती, चिंता, झोप न लागणे, ओसीडी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच कौटुंबिक नातेसंबंधांतील समस्या, शैक्षणिक अडचणी, व्यवसायातील अडथळे आणि दीर्घकाळापासून जाणवणाऱ्या शारीरिक तक्रारींमुळेही अनेकजण त्रस्त असतात. या पार्श्वभूमीवर मनाची कार्यपद्धती, सकारात्मक विचार आणि सबकॉन्शस माइंडच्या संकल्पनेविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यशाळेत अनुभवी व नामांकित तज्ज्ञांकडून प्रशिक्षण, मार्गदर्शन व विविध तंत्रांची माहिती दिली जाणार आहे. आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी आणि स्वतःच्या विचारशक्तीची ओळख करून घेण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
मोफत प्रवेश; नावनोंदणी आवश्यक
ही कार्यशाळा तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. इच्छुकांनी ९८५०१७०९३६ किंवा ८०८७४९२९४३ या क्रमांकांवर संपर्क साधून नावनोंदणी करावी. प्रवेश विनामूल्य असून जागा मर्यादित आहेत. अधिक माहितीसाठी SK Nandedkar यांच्या YouTube चॅनेललाही भेट देता येईल.



