छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी येथून सहा दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या दुचाकीची नंबर प्लेट आज आडूळ शिवारात आढळून आल्याने परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
रजापूर येथील नवनाथ विष्णू गायकवाड यांची MH 20 GR 6783 क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली होती. मात्र, आता या दुचाकीची नंबर प्लेट आडूळ शिवारात सापडल्याने दुचाकी नेमकी कुठे आहे आणि तिचे काय झाले, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध आणि नंबर प्लेट आडूळ शिवारात कशी पोहोचली, याचा उलगडा पोलिसांच्या तपासातून होणार आहे.

