छत्रपती संभाजीनगर, दि. २४ जुलै : मटण दुकानाचा परवाना काढून देण्यासाठी ६ हजार ५०० रुपयांची लाच मागून ती मोबाईलद्वारे स्वीकारल्याप्रकरणी मुख्य पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयातील डेटा ऑपरेटर अजय भगवान रोकडे (वय ४०) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
तक्रारदाराच्या भावाच्या मटण दुकानाचा परवाना काढून देण्यासाठी रोकडे याने ६ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १ हजार रुपये यापूर्वी मोबाईलद्वारे, तर २१ जुलै रोजी आणखी ५०० रुपये स्वीकारल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ जुलै रोजी सापळा रचला असता, आरोपीने उर्वरित ५ हजार रुपयांची लाच मोबाईलद्वारे स्वीकारली.
या प्रकरणी आरोपीला २३ जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीच्या अंगझडतीत सॅमसंग कंपनीचा मोबाईल तसेच लाच स्वीकारल्यासंदर्भातील पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे करीत आहेत. पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलीस निरीक्षक कोरे, पोलीस हवालदार जोशी, पोलीस अंमलदार डोंगरदिवे व बागुल यांनी कारवाईत सहभाग घेतला.
नागरिकांना आवाहन : कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
टोल फ्री : १०६४ | व्हॉट्सअॅप : ७७२०८९१०६४
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मटण दुकानाचा परवाना काढून देण्यासाठी ६ हजार ५०० रुपयांची लाच; डेटा ऑपरेटरला अटक
Related Posts
Add A Comment

