Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»कृषी»सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज; शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा
कृषी

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज; शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, वादळ तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून, पात्र शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केले आहे.

योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना स्वेच्छेने सहभागी होता येणार आहे. मात्र, त्यासाठी AGRISTACK Farmer ID असणे आणि डिजिटल पीक सर्वेक्षण (Digital Crop Survey – DCS) अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकराराची माहिती पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक राहील.

योजनेत सहभागी होण्यासाठी प्रति अर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्राची अट ठेवण्यात आली आहे. खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता म्हणून केवळ २ टक्के, रब्बी पिकांसाठी १.५ टक्के, तर नगदी पिकांसाठी ५ टक्के हिस्सा भरावा लागणार असून, उर्वरित विमा प्रीमियम शासनाकडून भरला जाणार आहे.

खरीप हंगामात पेरणीनंतर काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादनात घट झाल्यास पीक कापणी प्रयोग अथवा तांत्रिक उत्पादन मूल्यांकनाच्या आधारे नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळून शेती व्यवसायातील जोखीम कमी होण्यास मदत होईल.

योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने कठोर अटी लागू केल्या आहेत. चुकीची माहिती देऊन किंवा फसवणुकीच्या उद्देशाने पीक विमा घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्याला पीक विमा योजनेसह कृषी विभागाच्या विविध डीबीटी योजनांपासून पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.

अर्जासाठी जमिनीची कागदपत्रे, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक, आधारशी संलग्न बँक खाते तसेच AGRISTACK Farmer ID आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने सर्व पात्र शेतकऱ्यांना अंतिम मुदतीची वाट न पाहता ३१ जुलैपूर्वी अर्ज सादर करून सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

शेतकऱ्याचा सवाल

July 14, 2026

विशेष लेखः- शेतकरी कर्जमुक्ती योजना; सुलभ, सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती

July 8, 2026

खरीप हंगाम २०२६-२७ ज्वारी, बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी पीकस्पर्धा जाहीर प्रयोगशील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

July 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 16, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

अमृत-सक्षम’ उपक्रमाद्वारे कचरा व्यवस्थापनात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.