छत्रपती संभाजीनगर; दि,१४(प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘माय भारत’ (My Bharat) उपक्रमांतर्गत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष नोंदणी व जनजागृती अभियान राबविण्यात येतआहे.युवक-युवतींनी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून युवकांना आपल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी https://mybharat.gov.in या पोर्टल वर नोंदणी करावी.’माय भारत’ हे केवळ एक पोर्टल नसून, ते युवकांसाठी स्वयंसेवा, कौशल्य विकास, नेतृत्व विकास आणि सामाजिक सहभागाचे एक सक्षम डिजिटल व्यासपीठ आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश युवकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रनिर्माणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे.
शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, युवक मंडळे आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचून या पोर्टलचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार असून, त्याद्वारे युवकांना प्रत्यक्ष पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तांत्रिक मदत आणि मार्गदर्शन केले जाईल.
पोर्टलवरील विविध स्वयंसेवेच्या संधी आणि कौशल्यांच्या विकासाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जाणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेण्यासाठी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करावी.

