फुलंब्री | प्रतिनिधी
फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व साठवणुकीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ₹44.12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोहेकॉ/1197 अंकुश नानासाहेब बागल (वय 38), पोलीस स्टेशन फुलंब्री यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींची नावे :
जाबेर शेख शमीम शेख (वय 22, रा. आळंद, ता. फुलंब्री)
गोविंद शंकर सिंग ठाकूर (वय 39, रा. पाल)
विलास प्रभाकर तुपे
नंदू रवींद्र राऊत
अरुण यादव पारखे (रा. महाल किनहोळा, ता. फुलंब्री)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :
एमएच 20 ईजी 9595 क्रमांकाचा पांढऱ्या-निळ्या रंगाचा हायवा (अंदाजे किंमत ₹15,00,000) तसेच त्यामध्ये भरलेली 2 ब्रास वाळू (अंदाजे किंमत ₹12,000).
एमएच 20 एफपी 8074 क्रमांकाचा जेसीबी (अंदाजे किंमत ₹20,00,000).
घटनास्थळी साठवून ठेवलेली अंदाजे 150 ब्रास वाळू (अंदाजे किंमत ₹9,00,000).
अशाप्रकारे एकूण ₹44,12,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फुलंब्री पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गौण खनिज नियमांचे उल्लंघन व इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
टीप : पोलीस तपास सुरू असल्याने आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
फुलंब्रीत गौण खनिजावर मोठी कारवाई; हायवा, जेसीबी व 150 ब्रास वाळू जप्त
Related Posts
Add A Comment

