छत्रपती संभाजीनगर, दि.३(जिमाका)- सामाजिक वनीकरण विभागामार्फत दि.१५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सव राबविण्यात येतो. या कालावधीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रोपांची लागवड करावी यासाठी जिल्ह्यातील रोप वाटिकांमध्ये स्वस्त दरात ५ लक्ष २५ हजार रोपे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी संदीप गिरी यांनी दिली आहे.
याबाबत सामाजिक वनीकरण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ९ महिने वयाच्या सर्वसाधारण प्रजातीची रोपे अ,ब आणि क अशा वर्गवारीत उपलब्ध आहेत. अ वर्ग रोपांचा दर १८ रुप्ये प्रति रोप, तर ब वर्ग-११ रुपये, क वर्ग ८ रुपये प्रमाणे उपलब्ध आहेत. हे दर एरवीच्या दरांपेक्षा निम्मे वा त्यापेक्षाही कमी आहेत.
विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण यांच्या अखत्यारीतील रोपवाटिकांमध्ये रोपांची उपलब्धता व संपर्क अधिकाऱ्याचे नाव क्रमांक याप्रमाणे-
सावंगी ता. छत्रपती संभाजीनगर- रोपांची संख्या १ लाख ८० हजार, संपर्क अधिकारी- समीर इनामदार-९८६९१६०४०५
वैजापूर रोपवाटिका (चर्च, आयटीआय)- रोपांची संख्या १ लाख ७२ हजार ५००, संपर्क- यु.एच. चिकटे-९४२३४१७२९५.
पैठण(कातपुर)-रोपांची संख्या १ लाख ७२ हजार ५००, संपर्क जी.एस. सातपुते-९४२३४१७०८६.
असे एकूण ५ लाख २५ हजार रोपांची उपलब्धता करण्यात आली आहे.
या शिवाय वन महोत्सव कालावधीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रोप विक्री केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांची माहिती याप्रमाणे-
जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर-संपर्क समीर इनामदार-९८६९१६०४०५.
सार्वजनिक बांधकाम विभाग, फुलंब्री-श्रीमती पी.ए. काळे-९६५७२८१०५६.
तहसिल कार्यालय, सिल्लोड-ए.टी. पाटील-८८८८९७९०५५.
तहसिल कार्यालय, सोयगाव-एन.डी.काळे-९४०४६८०७७६.
तहसिल कार्याल, वैजापूर- यु.एच. चिकटे-९४२३४१७२९५.
पंचायत समिती कार्यालय, कन्नड-ए.एम.काटकर-९४२१६८५५५७.
पंचायत समिती कार्यालय, खुलताबाद-आर.डी. वलथरे-९७६४७४११७३.
पंचायत समिती कार्यालय, गंगापूर-ए.बी.गायके-७५८८५३८२०४.
पंचायत समिती कार्यालय, पैठण-जी.एस. सातपुते-९४२३४१७०८६.
या सर्व नागरिक, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये आदिंनी रोप उपलब्ध करुन घ्यावे व लागवड करावी,असे आवाहन विभागीय वन अधिकारी संदीप गिरी यांनी केले आहे.

