छत्रपती संभाजीनगर – कर्जापोटी पतसंस्थेला दिलेला धनादेश वटला नसल्याच्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने आरोपीस तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 1 लाख 12 हजार 572 रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
प्राप्त माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रेल्वेस्टेशन शाखेने मोहम्मद इद्रीस मोहम्मद इब्राहिम (रा. जहागीरदार कॉलनी, रेल्वेस्टेशन परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांना 51 हजार रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेकडून वारंवार मागणी करण्यात आली होती.
यानंतर आरोपीने फेब्रुवारी 2017 मध्ये 62 हजार 195 रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र संबंधित धनादेश बाऊन्स झाल्याने पतसंस्थेने न्यायालयात कलम 138 एन.आय. ॲक्ट अंतर्गत दावा दाखल केला.
या प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. के. पुरी यांच्या न्यायालयात झाली. सर्व बाजूंचा तपशील तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपीस तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा व 1 लाख 12 हजार 572 रुपयांचा दंड ठोठावला.
या प्रकरणात पतसंस्थेच्या वतीने मॅनेजर श्री रामेश्वर कैलास चव्हाण यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. तर विधीधिकारी श्री अनिल कचरू सुलताने यांनी कामकाज पाहिले. ॲड. वाय. के. जाधव व ॲड. आर. व्ही. कुंटे यांनी बाजू मांडली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
कर्जापोटी दिलेला धनादेश बाऊन्स; आरोपीस तीन महिन्यांचा कारावास शिक्षा
Related Posts
Add A Comment

