छत्रपती संभाजीनगर, दि. २३ (प्रतिनिधी) : ज्ञानकुंज कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश झिंजुर्के यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थिनी सना शहा व जयश्री काटकर यांनी सूत्रसंचालन केले. किरण त्रिभुवन, ब्रह्मांड साळुंखे, ऋतुजा आटोळे, भावना राणे आणि वैष्णवी वेताळ या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या प्राध्यापिका योगिता पारनेरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपावी, तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक मनोज राणे, नितीन पवार, राम राठोड, वृषाली कुलकर्णी, कृष्णा चव्हाण, अविनाश गाडेकर, योगेश सुरडकर, सुरेखा जाधव, दीपक पाटील, राहुल गायकवाड, विकास माळी, राजेंद्र कुवरा, भूषण जाधव, अविनाश कोलते, अक्षय जाधव आणि धुमाळ बाबा यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
— महाराष्ट्र न्यूज टाईम्स प्रतिनिधी

