विद्यार्थ्यांसाठी ब्रेन प्रोग्रामिंग व स्मरणशक्ती विकासावर विशेष मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर : आरोग्य, यश आणि अभ्यासातील प्रगतीसाठी मनाच्या शक्तीचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करणारा ‘पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड’ हा विशेष महासेमिनार शनिवार, दि. २४ आणि रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी तापडिया नाट्यमंदिर येथे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
स्वतःच्या क्षमतांचा विकास करू इच्छिणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे. आरोग्य, आर्थिक नियोजन, नातेसंबंध आणि स्मरणशक्ती यांसारख्या विषयांशी संबंधित अडचणींवर सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे, मोबाईलच्या अतिवापरासारख्या सवयींवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, परीक्षेची भीती कमी करणे आणि स्मरणशक्ती विकसित करण्यासाठी उपयुक्त तंत्रांची माहिती देणे, हे या कार्यक्रमाचे प्रमुख विषय आहेत. तसेच अभ्यासातील ताण कमी करून आत्मविश्वास वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
मोफत प्रवेश; नावनोंदणी आवश्यक
या महासेमिनारसाठी प्रवेश विनामूल्य असून, पूर्वनोंदणी अनिवार्य आहे. इच्छुकांनी ९८५०१७०९३६ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही लिंक ओपन करा
अधिक माहितीसाठी:
YouTube – SK. Nandedkar
https://youtube.com/@sknandedkar1626?si=ApNlRPh4bh7Yn5P3



