मुंबई | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहराला शुद्ध व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जायकवाडी पाणीपुरवठा योजनेची सर्व रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी पाण्याच्या टाक्या, वितरण व्यवस्था, हायड्रोलिक टेस्टिंग आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यावर भर दिला.
२०५२ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून ६०४ एमएलडी क्षमतेची ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत ५९ पाण्याच्या टाक्यांपैकी २९ पूर्ण झाल्या असून १९११ किमी पाइपलाइनपैकी १२९१ किमीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच आतापर्यंत ४६,५०० नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश : छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा
Related Posts
Add A Comment

