मुंबई | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. विधान भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सांताक्रूझ, विले पार्ले, कुर्ला तसेच जुहू येथील मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशनच्या निर्बंधामुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासाचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी फनेल झोनमधील इमारतींसाठी उपलब्ध असलेल्या एफएसआय (चटई निर्देशांक) चा प्रभावी वापर करण्याबाबत महापालिकेने स्पष्ट धोरण तयार करावे, तसेच आवश्यक ठिकाणी क्लबिंग (बांधकामांचे एकत्रीकरण) करण्याची शक्यता तपासावी, असे निर्देश दिले. पुनर्विकास प्रकल्प अधिक व्यवहार्य करण्यासाठी उच्च एफएसआयचा पर्याय उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
बैठकीस सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित साटम, आमदार पराग अळवणी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता आणि बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विविध पुनर्विकास यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून फनेल झोनमधील बाधित इमारतींचे मॅपिंग, पुनर्विकास प्रक्रिया आणि मंजुरी प्रणाली अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
फनेल झोन आणि मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्र्यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश
Related Posts
Add A Comment

