मुंबई | प्रतिनिधी : भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘देख ले! इंडिया’ या माहितीपटाचे मुंबईतील लोकभवन येथे युनिसेफच्या पुढाकाराने प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा प्रमुख उपस्थित होते. त्यांनी संघाच्या खेळाडूंचे कौतुक करत, “दृष्टिहीन खेळाडूंना सहानुभूती नव्हे, तर समान संधीची गरज आहे,” असे प्रतिपादन केले.
राज्यपालांनी सांगितले की, हा माहितीपट केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून जिद्द, आत्मविश्वास, मैत्री आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा देणारा आहे. समाजातील विविध घटकांनी हा माहितीपट पाहून दिव्यांगांविषयीचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक करावा, असेही त्यांनी नमूद केले.
माहितीपटाचे निर्माते मुकुंद मूर्ती यांनी सांगितले की, विशेष ध्वनी असलेल्या चेंडूच्या साहाय्याने अंध महिला क्रिकेटपटू क्रिकेट कसे खेळतात, त्यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक अडचणींवर मात करून या खेळाडूंनी देशासाठी उल्लेखनीय यश संपादन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांनी आपल्या अनुभवातून क्रिकेटमुळे आयुष्याला नवी दिशा, आत्मविश्वास आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. हा माहितीपट केवळ संघाची नव्हे, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक मुलीची प्रेरणादायी कहाणी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला खेळाडू प्रिया खीर व सुषमा पटेल, युनिसेफ महाराष्ट्राचे अधिकारी, तसेच क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI)चे पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे ७० मिनिटांच्या या माहितीपटात भारताच्या अंध महिला क्रिकेटपटूंचा वर्ल्ड ब्लाइंड गेम्सपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची कामगिरी अभिमानास्पद; ‘देख ले! इंडिया’ माहितीपटाचे लोकभवनात प्रदर्शन
Related Posts
Add A Comment

