मुंबई : महाराष्ट्र आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर जगातही नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला. ‘Mumbai Tech Week 2026’च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी राज्यात 10 हजार कोटी रुपयांची एआय गुंतवणूक, दीड लाख रोजगार निर्मिती, सहा सेंटर ऑफ एक्सलन्स आणि एआय इनोव्हेशन झोन उभारण्याची घोषणा केली. तसेच शेतकरी, आरोग्य, न्यायव्यवस्था आणि प्रशासनात एआयचा व्यापक वापर करून महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.

