मुंबई | प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे विचार समताधिष्ठित आणि सर्वसमावेशक भारताच्या निर्मितीसाठी आजही मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकरांचा वारसा समाजातील विषमता, जातीयवाद, उच्च-नीच भावना आणि स्त्री-पुरुष भेदभाव दूर करण्याचा संदेश देतो. प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि आत्मसन्मान मिळेल असा समाज घडविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
राज्यपालांनी पुढे सांगितले की, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पना साकार करण्यासाठी विकास सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या प्रवाहात सहभागी झाल्यास भारताला जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्था बनविण्याचे ध्येय निश्चितच साध्य होईल.
या कार्यक्रमात विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उद्योजक पद्मश्री डॉ. अशोक खाडे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केल्याने समाजात सकारात्मक विचार, राष्ट्रसेवेची प्रेरणा आणि उत्कृष्ट कार्याची भावना अधिक दृढ होत असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, विविध मान्यवर तसेच पुरस्काराचे मानकरी उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
Related Posts
Add A Comment

