छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी): महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार आता राज्यातील सर्व विवाह पत्रिकांवर वधू आणि वर या दोघांच्याही अचूक जन्मतारखा छापणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या निर्णयाचा मुख्य उद्देश बालविवाहाला आळा घालणे आणि विवाहासाठी कायदेशीर वयोमर्यादा पाळली जाते याची खात्री करणे हा आहे.
नवीन नियमानुसार, विवाह पत्रिकेत जन्मतारीख नमूद करण्यात आली आहे की नाही, याची जबाबदारी केवळ कुटुंबीयांवर न राहता संबंधित सर्व घटकांवर टाकण्यात आली आहे. यामध्ये आमंत्रण पत्रिका छापणारे मुद्रक, विवाह सोहळा पार पाडणारे पुरोहित (गुरुजी) तसेच खानपान व स्थळ व्यवस्थापन सेवा पुरवणारे यांचा संयुक्त सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे.
सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागरिकांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित 1098 या बाल सहाय्य हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा स्थानिक पोलिसांना कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.
या नव्या धोरणामुळे बालविवाहाच्या घटनांमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
महाराष्ट्रात विवाह पत्रिकांवर जन्मतारीख अनिवार्य; बालविवाह रोखण्यासाठी नवे धोरण लागू
Related Posts
Add A Comment

