हिटलर-नेताजी भेटीचे चित्रण चुकीचे असल्याचा आरोप; माफीची मागणी
मुंबई : अभिनेता प्रभासच्या आगामी ‘फौजी’ चित्रपटातील नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अॅडॉल्फ हिटलर यांच्या भेटीच्या चित्रणावर नेताजींचे नातू चंद्र कुमार बोस यांनी आक्षेप घेतला आहे. ऐतिहासिक घटनांचे चुकीच्या आणि सनसनाटी पद्धतीने सादरीकरण केल्याचा आरोप त्यांनी केला. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी संबंधित तथ्यांचा विपर्यास करणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी केली आहे.



