बिडकीन : बिडकीन-शेकटा मार्गावरील गिधाडा परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव तुषार बन्सीलाल कोकणे (वय ३०, रा. बिडकीन) असे प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार कोकणे हे दुचाकीवरून जात असताना गिधाडा परिसरात अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या घटनेबाबत मृताच्या नातेवाइकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत विविध शक्यता व्यक्त होत आहेत.
या प्रकरणाचा बिडकीन पोलिसांकडून तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या तपासाकडे आता नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



