परीक्षेतील गोंधळाविरोधातील आंदोलनाची दखल; ॲड. अक्षय झिरपे पाटील यांच्याकडून ‘तांडव विद्यार्थी संघटने’ची घोषणा
मुंबई : महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपीक (BHC Clerk) भरती परीक्षेत झालेल्या गोंधळाप्रकरणी अखेर परीक्षा रद्द करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, या निर्णयाचे ॲड. अक्षय झिरपे पाटील यांनी स्वागत करत माननीय उच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार मानले.
परीक्षेतील गोंधळ आणि परीक्षार्थींवर झालेल्या अन्यायाविरोधात ॲड. अक्षय झिरपे पाटील यांनी गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या आणि आंदोलनाची मोट बांधली होती. अखेरचा पर्याय म्हणून येत्या सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचे निवेदनही त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेत परीक्षा रद्द करण्यात आली.
‘तांडव विद्यार्थी संघटने’ची घोषणा
या लढ्याच्या यशानंतर ॲड. अक्षय झिरपे पाटील यांनी विद्यार्थी हक्कांसाठी ‘तांडव विद्यार्थी संघटना’ या नव्या संघटनेची अधिकृत घोषणा केली. भारतातील कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झाल्यास तांडव विद्यार्थी संघटना त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ही संघटना विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी कार्य करणारी संघटना म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कायदेशीर टीमसह सर्व सहकाऱ्यांचे आभार
या संपूर्ण आंदोलनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व राजकीय, सामाजिक मान्यवरांचे, कायदेशीर टीमचे आणि विद्यार्थ्यांचे ॲड. अक्षय झिरपे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
कायदेशीर सल्लागार व लीगल टीम : ॲड. उज्ज्वल निकम, ॲड. सतेज जाधव, ॲड. राजेश कातोरे, ॲड. नागवडे साहेब आणि संपूर्ण लीगल टीम.
विशेष सहकार्य व राजकीय/सामाजिक नेतृत्व :
अभिजित दिपके, माननीय मुरलीअण्णा मोहोळ, मुकुंद किर्दत (आप, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष), आमदार रोहित पवार, आमदार सत्यजित कदम, आमदार यशोमती ठाकूर, AISF महाराष्ट्र अध्यक्ष वैभव चोपकर आणि विराज देवांग.
तसेच महाराष्ट्रातील सर्व टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक, मालक, कर्मचारी, या आंदोलनात सातत्याने साथ देणारे विद्यार्थी आणि इतर सर्व मान्यवरांचेही त्यांनी आभार मानले.
– महाराष्ट्र न्यूज टाइम्स

