संस्कार वृक्ष आणि भावाची साथ
” नात्यांची ही सुंदर वीण कधीच उसवत नाही,
एकत्र कुटुंबाची जागा जगात कशानेच भरत नाही.
पैशांपेक्षा जिथे माणसांना महत्त्व दिले जाते,
त्यालाच खरे तर “सुखी एकत्र कुटुंब” म्हटले जाते.!
कुटूंब मोठे असो कि लहान एकमेकांशी असलेल्या संवादाच्या जोरावर त्याची वीण कायम घट ठेवता येते हे नाना नि आपल्या कामाने दाखवले !
खरं तर वटवृक्षाच्या सावलीत जशी पाखरं निवांत राहतात,मोठी होतात… त्याचप्रमाणे आम्ही सर्व कुटुंबातील मंडळी “नाना ” नावाच्या या वटवृक्षाखाली निवांत जीवन जगतो..
नाना बद्दल कितीही लिहिलं तरी शब्द,कागद, लेखणी कमीच पडेल,एव्हढी त्यांची यशस्वी कारकीर्द आहे.. नाना मिळून हे चार भाऊ आणि दोन बहिणी सर्वात मोठे भाऊ १.मगन नामदेव पाटील , २.गोविंद नामदेव पाटील (दाजी), ३ मणिलाल नामदेव पाटील (नाना ) ४ छन्नु नामदेव पाटील (दादा) त्यांना दोन बहिणी ५. सुमनबाई आणि ६ मथुराबाई याचे मुले आणि सून आणि नातवंडं मिळून 55 जणांचा भरलेले घर गोकूळासम भासते.
कमी लोकसंख्या असलेल्या छोट्या खेड्यातील सतखेडा गावात नाना चा जन्म… कमी शेती व परिस्थितीमुळे शिक्षण जेमतेम 10 वी पर्यंतच झालेले, तरीही छत्रपती संभाजी नगर येथे वर्ष 1981 मध्ये नानानी आपल्या कष्टाने नोकरी मिळवली , स्वाभिमानाने धनसंपत्ती सोबतच प्रतिष्ठा कामावली…परंतु शेतीची आवड व गावाकडची ओढ असलेल्या नाना नोकरीच्या काळात स्वतःची प्रगती सोडून भावाची प्रगती कडे ओढ होती व भावाचे कष्ट व आपल्या कौशल्य योजना राखून दोन ते तीन वर्षांनी शेती घ्याचे आज प्रत्येक भावाकडे १० ते १२ एकर शेत आहे. आणि भावाच्या प्रगती मध्ये मोठा विकास घडवून आणला.. सोबतच भावाची व मुलांची उच्च शिक्षणं पूर्ण करून आम्हाला कसल्याही गोष्टींची कमी पडू दिली नाही.
ज्या प्रमाणे वटवृक्षच्या पारब्या आणि मूळ खोलवर जोडलेली असतात त्याच प्रमाणे नाना ने एकत्र कुटूंबातील नाती, एकमेकांशी अजूनही तशी घट्ट जोडलेली आहे.
.खरं तर ज्याच्या जवळ स्वच्छ मन….आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन.. असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही
रिटायर्मेंट नंतर या वयात सुद्धा नाना शेतीची आवड व गावाकडची ओढ असते . खरंतर तर कष्ट हा उंबरठ्याचा दिवा आहे . . त्यांने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो.
त्यांची गावाबद्दल, माणसांबद्दल असलेली ओढ मी खूप जवळून पाहिली आहे. दु:खाची झळ आणि वेदनेची कळ” त्याच लोकांना जास्त कळते. जे……प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात.
ते सतत आनंदी असतात. नानाचा हा उत्साह,उमंग,उभारी, चिरतरुण आनंद.. साक्षी आहे त्यांच्या यशश्वितेची , वैचारिक प्रगल्भतेची , संस्कारांची , त्यांच्या लढवय्या वृत्तीची , जमिनीशी नाळ जोडलेल्या भावनेची … “नाना एकच असतात आणि एकच असावेत “..
आम्हाला या जीवनात थोडे जरी नाना सारखे होता आले तरी जीवन धन्य होईल ही भावना आमच्या कुटुंबात असते… नानाच्या अस्तित्वाचा चिरकाल आशीर्वाद आम्हाला मिळत राहील ही भगवंत चरणी इच्छा व प्रार्थना..

