Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»पावसाळी पर्यटनाला बेफिकीरीचे ग्रहण; स्टंटबाजी, ट्रिपल सीट अन् धिंगाण्याला आळा घालण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर

पावसाळी पर्यटनाला बेफिकीरीचे ग्रहण; स्टंटबाजी, ट्रिपल सीट अन् धिंगाण्याला आळा घालण्याची मागणी

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 23, 2026Updated:August 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्र न्यूज टाइम्स |
पावसाळा सुरू होताच धरणे, घाट, धबधबे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पर्यटनाच्या उत्साहात काहीजण सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पडेगाव-मिटमिटा रोड, दौलताबाद घाट, म्हैसमाळ रोड, जटवाडा आणि रसूलपुरा परिसरात डोंगराच्या कड्यावर जाऊन रील्स व फोटो काढणे, वाहनांवर स्टंट करणे, ट्रिपल सीट प्रवास, भरधाव वाहनचालक आणि कर्णकर्कश आवाजात वाहने चालविण्याचे प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वाळूज एमआयडीसी परिसरातील खवल्या डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेने पावसाळी पर्यटनस्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कौटुंबिक वादानंतर एका १९ वर्षीय तरुणाने डोंगरावर धोकादायक ठिकाणी जाऊन आत्महानीची धमकी दिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
तब्बल तीन तास समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असताना त्याला सुरक्षितपणे मागे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या दुर्दैवी प्रकारात तरुणासह त्याच्या वडिलांचा आणि आईचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्यटनस्थळांवरील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पर्यटनस्थळांवर विशेष बंदोबस्ताची मागणी
पावसाळ्यात डोंगरकडे, दऱ्या, धबधबे आणि घाट परिसरात घसरून पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाणे, सेल्फी-रील्ससाठी जीव धोक्यात घालणे आणि वाहनांवर स्टंट करणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, पडेगाव-मिटमिटा रोड, दौलताबाद घाट, म्हैसमाळ, जटवाडा, रसूलपुरा तसेच अन्य पर्यटनस्थळांवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस व ग्रामीण पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ट्रिपल सीट, भरधाव वाहनचालक, स्टंटबाजी, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी आहे.
वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कडक कारवाई झाल्यास पावसाळी पर्यटन अधिक सुरक्षित करता येईल, असा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

✍️ दिनेश गायके
संपादक | महाराष्ट्र न्यूज टाइम्स

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.