छत्रपती संभाजीनगर : हायकोर्ट लिपिक भरतीच्या स्किल टेस्टदरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा देण्यासाठी पुरेसे संगणक उपलब्ध नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
काही संगणक परीक्षा सुरू असतानाच बंद पडले, तर काही संगणकांचे की-बोर्ड काम करत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेल्याचा आरोप असून, परीक्षा व्यवस्थापनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
परीक्षा द्यायला संगणकच अपुरे; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ का?
परीक्षा केंद्रावर आवश्यक तांत्रिक सुविधा आणि पुरेसे संगणक उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच या प्रकाराची योग्य चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स

