खुलताबाद | एस के शेख प्रतिनिधी : खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा गावाजवळ महावितरणच्या कथित भोंगळ कारभारामुळे वीज खांबावर काम करत असताना एका ‘झिरो वायरमन’चा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोरख बाबुराव जाधव (रा. कसाबखेडा, ता. खुलताबाद) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वीज खांबावर दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महावितरणच्या कार्यपद्धतीवर आणि सुरक्षाव्यवस्थेवर ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ‘झिरो वायरमन’कडून धोकादायक कामे करून घेतली जात असतील, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच वीज दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
महावितरणचा भोंगळ कारभार; ‘झिरो वायरमन’चा विजेचा धक्का लागून मृत्यू
Related Posts
Add A Comment

