छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी हे आदेश निर्गमित केले असून हे आदेश दि.२१ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत हे आदेश अंमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

