Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»पर्यावरण दिनानिमित्त केवळ फोटोसेशन नव्हे, झाडे जगवण्यावर भर द्या; कौशल्य सेवा फाउंडेशनची प्रशासनाला साद
छत्रपती संभाजीनगर

पर्यावरण दिनानिमित्त केवळ फोटोसेशन नव्हे, झाडे जगवण्यावर भर द्या; कौशल्य सेवा फाउंडेशनची प्रशासनाला साद

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर 5जून | (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
पर्यावरण दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळींनी वृक्षारोपणाचे उपक्रम राबवून त्याचे फोटो सोशल मीडियावर व वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केले. मात्र, प्रत्यक्षात शहरातील वाढते प्रदूषण, घटणारी हरित पट्टी आणि नष्ट होत चाललेली जुनी झाडे ही चिंतेची बाब असल्याचे मत कौशल्य सेवा फाउंडेशन यांनी व्यक्त केले आहे.
फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, “फक्त झाडे लावणे पुरेसे नाही, तर ती जगवणे अधिक महत्त्वाचे आहे. दहा झाडे लावून ती वाळण्यापेक्षा एक झाड लावून ते मोठे करणे अधिक गरजेचे आहे.” प्रशासनाकडून वृक्षारोपणाचे अनेक उपक्रम राबवले जात असले तरी झाडांच्या संवर्धनासाठी आणि संगोपनासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील रस्ते रुंदीकरण, विविध विकासकामे आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली अनेक दशकांपासून उभी असलेली वड, पिंपळ आणि इतर मोठी झाडे तोडली जात आहेत. या झाडांमुळे नागरिकांना सावली मिळत होती, पक्ष्यांना निवारा मिळत होता तसेच प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यास मदत होत होती. मात्र, त्या बदल्यात लावण्यात येणारी नवीन झाडे कितपत जगतात आणि त्यांचे संगोपन कसे केले जाते, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कौशल्य सेवा फाउंडेशनने प्रशासनाला आवाहन केले आहे की, विकासकामांचे नियोजन करताना स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संस्था, स्वयंसेवी संघटना (NGO) आणि तरुणांना विश्वासात घ्यावे. एखादे मैदान, रस्ता किंवा अन्य विकास प्रकल्प राबविताना झाडतोडीचा निर्णय एकतर्फी न घेता पर्यावरणीय परिणामांचा विचार करावा आणि पर्यायी वृक्षलागवड व संवर्धनाची ठोस जबाबदारी निश्चित करावी.
“झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची वेळ आली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या संकटातून शहराला बाहेर काढण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी केवळ एका दिवसापुरते उपक्रम न राबवता वर्षभर सातत्याने प्रयत्न व्हावेत आणि शहराची हरित ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी कौशल्य सेवा फाउंडेशन यांनी प्रशासनाकडे केली आहे.

#पर्यावरणदिन #झाडेलावाझाडेजगवा #छत्रपतीसंभाजीनगर #कौशल्यसेवाफाउंडेशन #पर्यावरणसंवर्धन #वृक्षारोपण #GreenCity #MaharashtraNewsTimes
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.