छत्रपती संभाजीनगर, दि. 4 : राज्यातील कुक्कुटपालकांना शासनाच्या विविध योजना व सवलतींचा लाभ मिळावा यासाठी सर्व कुक्कुटपालकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे डॉ. नानासाहेब कदम यांनी केले आहे.
पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात आयुक्त डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीत कुक्कुटपालन व्यवसायातील सद्यस्थिती, कायदेशीर नियम, वीजदर सवलत, खाद्य गुणवत्ता नियंत्रण, ग्रामपंचायत एनओसी आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्य सरकारने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर कुक्कुटपालकांना शेतीप्रमाणे विविध सवलती मिळू लागल्या आहेत. वीज बिल सवलतीसाठी राज्यातील 90 हजार लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यापैकी 63 हजार व्यावसायिकांची माहिती महावितरणकडे पाठविण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी अचूक ग्राहक क्रमांकासह माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत कुक्कुट खाद्याच्या पिशव्यांवर घटकांची स्पष्ट माहिती देणे, करार पद्धतीतील कुक्कुटपालनासाठी वारंवार ग्रामपंचायतीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मागण्याची अडचण दूर करणे तसेच ग्रामपंचायत कर आकारणीबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्यावर भर देण्यात आला.
तसेच वीजदर सवलत, पक्ष्यांमधील साथरोग प्रतिबंध, लसीकरण, खाद्य विश्लेषण, गुणवत्ता नियंत्रण आणि किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आर्थिक सहाय्य या विषयांवरही चर्चा झाली. पशुसंवर्धन विभाग लवकरच या विषयांवर सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.
बैठकीत राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अंतर्गत कुक्कुटपालनाला चालना देणाऱ्या योजनांबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
कुक्कुटपालकांसाठी दिलासादायक निर्णय; नोंदणीचे आवाहन राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
Related Posts
Add A Comment

