मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या मे २०२६ अंकाचे प्रकाशन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव तथा अतिथी संपादक आप्पासो धुळज यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, कक्ष अधिकारी प्रशांत वामन तसेच इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे सल्लागार कार्तिक पांडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
मे २०२६ च्या अंकामध्ये विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीतील तंत्रज्ञान, सामाजिक संवेदनशीलता आणि सर्वसमावेशक विकासाचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम तंत्रज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित लेखांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे.
याशिवाय सांस्कृतिक, भावनिक आणि मानवी मूल्यांना स्पर्श करणारे विविध लेखही या अंकाचे विशेष आकर्षण ठरत आहेत. शासनाच्या विकासाभिमुख धोरणांसोबतच समाजातील सकारात्मक बदलांचे प्रतिबिंब या अंकातून पाहायला मिळते.
मंत्रालयातील विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सर्जनशील क्षमतांना अभिव्यक्तीची संधी मिळत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या मे २०२६ अंकाचे प्रकाशन सचिव आप्पासो धुळज यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न
Related Posts
Add A Comment
