छत्रपती संभाजीनगर 28मे (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर येथे “आपला वारसा आपली संस्कृती” या विषयावर भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जीएच रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन आणि जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत तब्बल 227 स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
स्पर्धेतील विजेत्यांना महापौर समीर राजूरकर, उपायुक्त अंकुश पांढरे, जी एल रायसोनी विद्यापीठाचे डीन डॉ. अविनाश काटे, प्रशासन अधिकारी तथा मुख्याध्यापक संजीव सोनार, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद काकडे, सचिव देव शेजुळ, प्रमोद अडसुळे तसेच फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर निकम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत किशोर निकम यांनी शहरात स्वतंत्र आर्ट गॅलरी नसल्यामुळे कलाकारांना चित्रप्रदर्शन भरविण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. यावर अध्यक्षीय भाषणात महापौर समीर राजूरकर यांनी दिवाळीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शहरात एक आर्ट गॅलरी तयार करून देण्याचे आश्वासन दिले.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. महेश शिरसागर, विद्यासागर, वैशाली टाकळकर, प्रा. स्वाती देशपांडे आणि प्रा. महेंद्र खाजेकर यांनी केले. निकाल वाचन वैशाली टाकळकर यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन किशोर निकम यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. देवेंद्र पोटदुखे, भारत पुसे, सचिन लव्हेरा, सुनील गोरे आणि सुरेश देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :
ग्रुप अ
प्रथम – आदित्य काचवेवार
द्वितीय – प्रद्युगन अंजनकर
तृतीय – सावनी बडे
उत्तेजनार्थ – अन्वी खोडे, ईशावरी चलवारी, आराध्या चाफले, सुशांत गोटे
ग्रुप बी
प्रथम – Shivani राजगुरू
द्वितीय – सोहम सुनील गोरे
तृतीय – रुद्रानी देशपांडे
उत्तेजनार्थ – मृणाल कुमार, मृणाल वाढेकर, सावित्र वाकळे, आदित्य अरख
ग्रुप सी
प्रथम – सुप्रिया चव्हाण
द्वितीय – मच्छिंद्र भोई
तृतीय – रवींद्र वाकले
उत्तेजनार्थ – विनोद भोरे, अतुल पवार, अनिकेत शिंदे, राधा अंजनकर








