दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४ गडी राखून पराभूत केले. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. १८१ धावांचे लक्ष्य गाठताना १४.५ षटकांत भारताची अवस्था ६ बाद ११२ अशी झाली होती. मात्र त्यानंतर तिलक आणि नितीश रेड्डी यांनी सातव्या विकेटसाठी ३० चेंडूंमध्ये ६९ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
तिलकने २६ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि एक षटकार ठोकला, तर नितीश रेड्डीने १३ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या.



