जालना 28मे 2026 प्रतिनिधी.
जालना शहरातील मामा चौक ते कोलू तेली घाणा संघ परिसरातील अतिक्रमण हटविणे व नालेसफाई कामासाठी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. प्रभारी सहायक अतिक्रमण पथक प्रमुख भाऊलाल राठोड व श्यामसन कसबे या दोघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी 40 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. पडताळणीत मागणी निष्पन्न झाल्यानंतर 28 मे रोजी बाबा टी हाऊस, जुना मोंढा, जालना येथे सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी कसबे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर राठोड यांनाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
जालना महानगरपालिकेतील दोन अतिक्रमण अधिकाऱ्यांना 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
Related Posts
Add A Comment

