छत्रपती संभाजीनगर, दि. ११ मे : (
महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
प्रत्येक सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या संबंधित झोनमधील वसुलीयोग्य १०० कर थकबाकीदार मालमत्तांची यादी तयार करून कर वसुलीसाठी विशेष पाठपुरावा करावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी आज दिले.
आज दुपारी २ वाजता कर वसुलीबाबतचा आढावा त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना विविध सूचना केल्या.
प्रत्येक सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या वार्डातील वसुलीयोग्य १०० मालमत्तांची यादी तयार करून संबंधित मालमत्ताधारकांकडून थकीत कर वसूल करण्यासाठी वैयक्तिक लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी संबंधित सहाय्यक आयुक्तांनी स्वतः पाठपुरावा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर आकारणी न झालेल्या किंवा कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांचा शोध घेऊन कर आकारणी करावी अथवा कर वसुली करावी, असे निर्देश यापूर्वीही देण्यात आले आहेत. याशिवाय “ *माझा कर, माझी जबाबदारी”* या मोहिमेंतर्गत थकबाकीसह एकरकमी कर भरणाऱ्यांना व्याजावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे.
आयुक्तांनी अशा मालमत्तांचा शोध घेण्यासाठी, ज्यांची कर आकारणी झालेली नाही किंवा संबंधित मालक कर भरत नाहीत, प्रत्येक झोनमध्ये बिल कलेक्टर आणि पथक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. संबंधित बिल कलेक्टर आणि पथक प्रमुखांनी दररोज किमान ५० मालमत्तांना भेट देऊन पाठपुरावा करणे गरजेचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
एका महिन्याच्या आत नेमून दिलेल्या सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच सर्व सहाय्यक आयुक्तांनी श्रीमित्र डॅशबोर्डवर बिल कलेक्टरांनी किती मालमत्तांना भेट दिली, किती कर आकारणी झाली आणि किती कर वसुली झाली यावर सातत्याने लक्ष ठेवावे, असे सांगितले.
पुढील बैठकीत कर वसुलीचे आकडे वाढलेले दिसले पाहिजेत, असे स्पष्ट करत चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर संदेश द्यावेत, तर उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सर्वात कमी मालमत्तांचे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला.
या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे, उपआयुक्त श्री विकास नवाळे उपस्थित होते, तर सर्व सहाय्यक आयुक्त ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
कर थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक झोनमध्ये १०० मालमत्तांची यादी तयार करा : आयुक्त अमोल येडगे
Related Posts
Add A Comment

