महानगरपालिका टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बायजीपुरा येथील सर्व सुविधा युक्त टेबल टेनिस क्रीडा हॉलचे उद्घाटन,
यावेळी मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त जी श्रीकांत, लोकमतचे संपादक राजेंद्र दर्डा, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेता समीर साजिद बिल्डर, ओसामा कबीर मौलाना, प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, नगरसेवक रामेश्वर भारवे, संगीता सांगळे, संजय कडू, निलेश मित्तल, विक्रम डेकाटे, कुलजितसिंग दारोगा आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री अतुल सावे, राजेंद्र दर्डा, आयुक्त जी श्रीकांत यांनी अल्पावधीत हाॅल निर्मिती बद्दल संघटनेच्या कार्याचे कौतुक करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील असा आशावाद व्यक्त करून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
प्रारंभी संघटना अध्यक्ष निलेश मित्तल, विक्रम डेकाटे, राज जैस्वाल, कुलजीतसिंग दरोगा, श्रीपाद जोशी, डॉ.सुहरीद अन्नछत्रे, मनोज कानोडजे, किशोर उबाळे, सचिन पुरी, जगन्नाथ वाघ, संध्या पंतोजी, अभिजीत तांबोळी, चेतन डेखाटे, देसाई आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी राज्य संघटनेचे अतुल गोलवणकर प्रकाश तुळपुळे तसेचमहानगरपालिकाचे
रणजीत पाटील कल्पिता पिंपळे, अपर्णा थेटे, संजय कोंबडे, बाळासाहेब शिरसाट, पूजा भोगे तसेच खेळाडू व शालेय विद्यार्थी क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले ध्येय नेहमी उंच ठेवा. कठोर परिश्रमाने ध्येयपूर्तीचा संकल्प गाठता येतो. मेहनतीने यशोशिखर गाठता येते. संकल्प लहान ठेवला तर तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. असे प्रतिपादन टेबल टेनिस पद्मश्री पुरस्कार विजेते अचंता शरद कमल यांनी केले.
प्रारंभ संघटना अध्यक्ष निलेश मित्तल प्रास्ताविक मनोगतात म्हणाले की,
मंत्री अतुल सावे आयुक्त जी. श्रीकांत, क्रीडा प्रेमींच्या सहकार्याने इतिहासात नोंदवले गेलेल्या हॉलचे अतिजलद गतीने 120 दिवसात काम पूर्ण झाले. असे सांगून कृतज्ञता भावना व्यक्त केली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य टेबल टेनिस हॉलचे थाटात उद्घाटन
Related Posts
Add A Comment

