छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांवर आधारित मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची भारत सरकारने स्थापन केलेली भारतीय खेल प्राधिकरण (SAI)सेंटर, विभागीय क्रीडा संकुल ,मनपा गरवारे क्रीडा स्टेडियम ,तसेच राष्ट्रीय दर्जाचा टेबल टेनिस हॉल येथे
विशेष समर कॅम्प दिनांक 23 एप्रिल ते 7 जून 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले असून,
या शिबिरामध्ये ऑलिम्पिक खेळांशी संबंधित विविध क्रीडा प्रकारांचे अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये फेन्सिंग, बॉक्सिंग, टेबल टेनिस, आर्चरी, ॲथलेटिक्स, हँडबॉल व सॉफ्टबॉल ,टेबल टेनिस, या खेळांचा समावेश आहे.
या उपक्रमाचे नियोजन उपायुक्त अंकुश पांढरे, यांच्या मार्गदर्शनाखाली भारत तिनगोटे शिक्षणाधिकारी व ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम आधिकारी, आणि संजय बालया क्रीडा अधिकारी,सागर मगरे क्रीडा प्रशिक्षक यांनी केले आहे.
याशिवाय, साई सेंटरच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांचेही विशेष मार्गदर्शन व सहकार्य या शिबिरास लाभले आहे.
या शिबिराचा मुख्य उद्देश महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांची ओळख करून देणे, त्यांच्यात विविध क्रीडाप्रकार प्रती आवड निर्माण करणे तसेच भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडविणे हा आहे.
तसेच सर्व शाळेत दिनांक 23 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत कला, क्रीडा कार्यानुभव आणि संगीत व खेळता खेळता शिका या उपक्रमावर आधारित समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे .या साठी सर्व मुख्याध्यापक,शिक्षक संगीत आणि क्रीडा प्रशिक्षक तसेच कला क्रीडा कार्यानुभव अंशकालीन निदेशक मेहनत घेत आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच ऑलिम्पिक क्रीडा समर कॅम्पचे आयोजन
Related Posts
Add A Comment

