टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा
छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक परिसर भगव्या उत्साहाने आणि शिवमय वातावरणाने दुमदुमून गेला. हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जयंती महोत्सवाला हजारो शिवप्रेमींनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत महाराजांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या जोशपूर्ण पोवाड्यांचे सादरीकरण. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान यांचे प्रभावी वर्णन त्यांनी आपल्या ओजस्वी शैलीत केले. पोवाड्यांदरम्यान उपस्थित शिवभक्तांनी “जय भवानी, जय शिवाजी”, “धर्मवीर संभाजी महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या भव्य सोहळ्यास शहरातील अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावत आयोजकांचे कौतुक केले. यामध्ये महापौर श्री. समीर राजूरकर, खासदार श्री. कल्याण काळे, आमदार श्रीमती संजयताई जाधव, श्री. कैलास पाटील, श्री. संजय केनेकर, श्री. अभिजीत देशमुख, श्री. अजिंक्य सावे, श्री. केंद्रे सर, श्री. महेश माळवतकर, श्री. राज वानखेडे, श्री. शिवाजी दांडगे, श्री. किशोरजी शितोळे, श्री. संदीप बोरसे, श्री. चंद्रकांत भराट, श्री. दामू अण्णा शिंदे तसेच श्री. गणेश नावंदर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मा. श्री. पृथ्वीराजभाऊ पवार, मा. श्री. कैलासजी पाटील आणि मा. श्री. अभिजीतभय्या देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री. मनोज गायके पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आयोजन उत्साहात पार पडले.
उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. गणेश साबळे, कार्याध्यक्ष श्री. अजय गंडे, स्वागताध्यक्ष श्री. सतीश तवर आणि सरचिटणीस श्री. ओंकार माळवदकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आयोजन समितीतील अनेक कार्यकर्ते तसेच “जिजाऊच्या लेकी” समूहातील महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला.
संपूर्ण परिसर भगव्या पताका, ढोल-ताशांचा गजर आणि शिवकालीन घोषणांनी भारावून गेला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा
Related Posts
Add A Comment

