मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ : दुसऱ्या फेरीतील मतमोजणी अपडेट
डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर; सतीश चव्हाण यांच्यापेक्षा १०,४२० मतांची आघाडी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६च्या दुसऱ्या फेरीतील मतमोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना १९,५०३ मते मिळाली, तर सतीश चव्हाण यांना १६,९६१ मते मिळाली.
पहिल्या व दुसऱ्या फेरीची एकत्रित मतसंख्या
पहिल्या आणि दुसऱ्या फेरीअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना एकूण ४७,४९७ मते मिळाली आहेत. सतीश चव्हाण यांच्या खात्यात ३७,०७७ मते जमा झाली आहेत.
दोन्ही फेऱ्यांअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील हे सतीश चव्हाण यांच्यापेक्षा एकूण १०,४२० मतांनी आघाडीवर आहेत. पुढील फेऱ्यांतील मतमोजणीकडे उमेदवारांसह समर्थकांचे लक्ष लागले आहे.



