494 वैध
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) सुरुवात झाली असून, पहिल्या फेरीतील मतमोजणीत सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या 494 वैध
टपाली मतदानाच्या मोजणीतही सतीश चव्हाण आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात चव्हाण यांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, अंतिम निकालासाठी पुढील फेऱ्यांतील मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत एकूण 41 उमेदवार रिंगणात असून, मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणी केली जात आहे. त्यामुळे अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.



