नुरजहान इकबाल यांची १६ नोव्हेंबरला सुनावणी; उर्वरित प्रकरणांसाठी नोव्हेंबरमध्ये तारखा निश्चित
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम १०(१) व १०(१-D) अन्वये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत संबंधित सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान विविध प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली असून, पुढील सुनावणीसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, श्रीमती नुरजहान इकबाल यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. श्री मिराज खान जलील खान यांच्या प्रकरणाची सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, अन्य सहा सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणांची पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.
या सदस्यांच्या प्रकरणांवर होणार सुनावणी
३० नोव्हेंबर रोजी सुनावणी होणाऱ्या सदस्यांमध्ये अभिजीत देविदास जीवनवाल, गणेश नावंदर, फिरोज खान मेहरुद्दीन खान, मोहम्मद वसीम अलीम अहमद, सय्यद सोहेल सय्यद महेमूद हसन आणि श्रीमती तरन्नुम अकील अहमद यांचा समावेश आहे.
संबंधित सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रकरणांवर निर्धारित तारखांना पुढील सुनावणी होणार असून, या सुनावण्यांकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



