छत्रपती संभाजीनगर : श्री सत्यसाई रक्त संकलन केंद्र, क्लब ऑफ अनंता आणि हेल्थ हार्मोनियम यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल वर्षा शेजारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला अनंता हेल्थ क्लब, हार्मोनियम तसेच कॅनॉल गार्डन परिसरातील असंख्य व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
श्री सत्यसाई रक्त संकलन केंद्र हे थॅलेसेमिया रुग्णांसाठी कार्यरत असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जाते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनेकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
या उपक्रमासाठी सौ. रश्मी येरमे, सुजय जेथलिया, डॉ. महेंद्रसिंग चौहान, डॉ. मुदगलकर, जनसंपर्क अधिकारी अरुण वाकडीकर, ग्रँड मास्टर एशिया (योग) अनिल बी. महाजन, सारिका रगडे, तंत्रज्ञ चरणसिंग चव्हाण, प्रियांका चौधरी, नेहा फासे, विलास सरोदे, कल्पना शेळके व इतर सहकाऱ्यांनी रक्तसंकलनासाठी सहकार्य केले.
रक्तदान करा, जीवन वाचवा! रक्तदान हेच श्रेष्ठदान! या संदेशातून नागरिकांनी नियमित रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.









