छत्रपती संभाजीनगर : ७५ व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस शिपाई शृंखला रत्नपारखी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. त्यांच्या या यशामुळे छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दि. २१ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान मध्य प्रदेशातील हरियाणा येथे झालेल्या या स्पर्धेत शृंखला रत्नपारखी यांनी ६२ किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. त्यांच्या या यशाचे पोलीस दलातून कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त, राखीव पोलीस निरीक्षक सतीश मुथाळ तसेच क्रीडा प्रमुख राजेंद्र ज्ञानबाव आदी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी शृंखला रत्नपारखी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शृंखला यांच्या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविले. त्यांच्या यशामुळे पोलीस दलातील खेळाडूंना प्रेरणा मिळणार असून, क्रीडा क्षेत्रात महिलाही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे.



