(एस के शेख फुलंब्री प्रतिनिधी) अखंड हरिनाम सप्ताह 94 वर्षे, या निमित्ताने आज रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाज शिरोडी गावातील विविध क्षेत्रात गुणवत्तेवर उल्लेखनीय यश आणि कर्तृत्व सिद्ध करण्या-या गावातील तरुणांचा तसेच विविध विभागात सेवा पुर्ण करु सेवा निवृत्त झालेल्या ग्रामस्थांचा गौरव सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मा खा.डॉ कल्याणराव काळे साहेब, मा आमदार सौ अनुराधाताई चव्हाण, मा.आ श्री सुहास भाऊ शिरसाट,मा श्री अतुल काका चव्हाण साहेब मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा बँकेचे संचालक मा श्री अनिलराव बोरसे साहेब यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह भ प बाबासाहेब महाराज आनंदे यांनी भुषविले, ह भ प उद्धव महाराज आनंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ग्रामस्थ पंचक्रोशीत नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सर्जेराव पाटील श्रीखंडे यांनी केले,श्री अनिल साळुंके यांनी सूत्रसंचालन केले आणि उद्योजक श्री कैलासराव पाटील भोकरे साहेब यांनी मानले..
गुणवंत शालेय विद्यार्थ्यांसह, वैद्यकीय शिक्षण घेत असलेले 7 विद्यार्थी, आय आय टी सारख्या संस्थेत शिक्षण घेत असलेले 2 विद्यार्थी, सैन्य दल आणि पोलिस दलात दाखल झालेल्या 5 जणांचा, पी एच डी पूर्ण करण्यारे 3, चार्टर्ड अकाउंटंट C A दोन, विविध शासकीय विभागात सेवा देण्यासाठी नव्याने दाखल झालेले शासकीय सेवेत आणि आपल्या खाजगी व्यवसायात दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या 15 आणि सेवानिवृत्त झालेल्या 9 ग्रामस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मा श्री दिलीपराव शिरोडकर, श्री सिताराम पाटील साळुंके आणि श्री दत्तात्रय पाटील आटुळे, श्री सर्जेराव पाटील श्रीखंडे बापू आणि सर्वांच्या मार्गदर्शनात अतिशय शानदार झालेल्या या सोहळ्याला सर्व गावकरी मंडळीचे भरभरून सहकार्य लाभले..
श्री बबन भाऊ आटुळे, श्री सोमिनाथ श्रीखंडे, श्री विशाल भोकरे यांच्यासह सर्व तरुण मित्र मंडळी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष कष्ट घेतले.
या निमित्ताने जिल्हा बँकेचे संचालक मा श्री अनिलभाऊ बोरसे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी वॉटर प्युरिफायर, आ सुहास भाऊ शिरसाट साहेब यांच्या कडून पोर्टेबल साऊंड सिस्टीम तत्काळ भेट म्हणून देण्यात आली.
सर्व मान्यवरांनी शाळेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जबाबदारी घेतली तर मा श्री अतुल काका चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रयतेची शाळा उपक्रम राबविण्यासाठी गावातील शाळेची निवड करण्यात आली आहे.



