महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करून अभिनंदन
छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. अश्विनी लाठकर मॅडम यांची भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या सहाय्यक राज्य आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे यांच्या हस्ते अश्विनी लाठकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आसाराम शेळके, अरुण शिंदे, भारत चाटे, जगदीश गोंदे पाटील, मुरलीधर घोगरे आणि राजेंद्र ठाकरे यांची उपस्थिती होती.
अश्विनी लाठकर यांची या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन, सेवाभाव, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्यासाठी कार्य केले जाते. या जबाबदारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
नियुक्तीबद्दल अश्विनी लाठकर मॅडम यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.



