ज्येष्ठांचा अनुभव आणि नव्या कार्यकर्त्यांची ऊर्जा संघटन मजबूत करणार : राधाकिसन पठाडे
फुलंब्री : (एस के शेख फुलंब्री प्रतिनिधी) शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील गणोरी येथील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हा परिषद गटनेते तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार मा. श्री. राधाकिसन पठाडे बापू यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
छत्रपती संभाजीनगरचे खासदार मा. श्री. संदिपानजी भुमरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत गणोरी येथील विविध ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षात नव्याने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना राधाकिसन पठाडे बापू यांनी सांगितले की, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन आणि नव्या कार्यकर्त्यांची ऊर्जा यांचा योग्य समन्वय साधल्यास पक्षाची संघटनात्मक ताकद निश्चितच अधिक मजबूत होईल. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख कार्याला गती देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गणोरी येथील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.
या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
गणोरी येथील श्री. अप्पाराव पां. जाधव, श्री. अण्णा पां. भादवे, श्री. सय्यद रौनकअली, श्री. दामोधर पां. जाधव, श्री. माणिक पां. उबाळे, श्री. बालू पां. तांदळे, श्री. राजू पां. तांदळे, श्री. प्रभाकर पां. तांदळे आणि श्री. सुदाम पां. तांदळे यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमामुळे गणोरी परिसरात शिवसेनेच्या संघटनात्मक हालचालींना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आगामी काळात गावपातळीवर पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक दिनेश गायके
८२७५०९७१६१



