पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटील तांदळे यांचा माणुसकीचा हात
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटील तांदळे यांनी आपले एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची दखल घेत त्यांनी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला. जनसेवेच्या माध्यमातून संकटग्रस्तांना आधार देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे तांदळे यांनी सांगितले.
“दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी माझे एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहे. जनसेवेतून माणुसकी जपण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे,” अशी भावना पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटील तांदळे यांनी व्यक्त केली.
त्यांच्या या निर्णयाचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून स्वागत होत असून, लोकप्रतिनिधींनीही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



