वारेगाव (एस के शेख प्रतिनिधी फुलंब्री )छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी मा. श्री. विनय गौडा यांनी आज मौजे वारेगाव येथे दुष्काळग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची परिस्थिती जाणून घेत दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान तालुका प्रशासनातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी, संदीप दादा बोरसे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली.
दुष्काळग्रस्त भागातील पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि उपलब्ध पाण्याची परिस्थिती याबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणीमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.



