फुलंब्री | एस के शेख प्रतिनिधी
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती मिळावी आणि शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील सिंचन भवनात भेट घेण्यात आली.
यावेळी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत मतदारसंघातील विविध सिंचन प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रलंबित कामांना आवश्यक ती गती देऊन प्रकल्पांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाण्याचा आधार मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्र न्यूज टाईम
संपादक दिनेश गायके



